यावल : शहरासह किनगाव येथील तरुणाला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव सायबर क्राईम विभागाकडे याबाबत तक्रार देण्यात आली आहे. शहरातील एका तरुणास कोमल व किनगाव येथील एका तरुणास नेहा या तरुणींनी फेसबुकवर फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली व या दोघा तरुणांनी ती स्विकारली तर नंतर या तरुणींनी त्यांचा व्हॉटसअप नंबर मागितला व दोघा तरुणांनी या तरुणांसोबत चॅटींग सुरू केली व त्यानंतर व्हिडिओ कॉलदेखील सुरू झाला. त्यानंतर तरुणींनी विवस्त्र होत तरुणांना देखील विवस्त्र होण्यास सांगत त्याचे व्हिडीओ चित्रण केले व नंतर हे चित्रण धसोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रकार केल्याने खळबळ उडाली. दरम्यान, तरुणांनी सर्व चॅटींग व विविध माहिती जळगाव सायबर क्राईम विभागाला देत या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.