यावल तालुक्यात दोन अपघातात जि.प.सदस्यांसह तिघे जखमी

0

108 वर डॉक्टर नसल्याने नातेवाईकांचा तीव्र संताप

यावल- तालुक्यात शुक्रवारी दोन अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये जिल्हा परीषदेचे माजी सदस्य सुभाष गेंदू सोळुंके (रा.चिंचोली) यांचा समावेश असून त्यांच्यासह सर्व जखमींवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगावी हलवण्यात आले. रुग्णालयात 108 वाहन असतानाही त्यावर डॉक्टर नसल्याने भुसावळ येथुन वाहन बोलवण्यात आले. त्यात अर्धातास जखमींना नेण्यास विलंब झाल्याने जखमींच्या नातलगांनी संताप व्यक्त केला.

चारचाकीसह दुचाकी उलटली
शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास यावल-सातोद रस्त्यावर वळणाचा अंदाज न आल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. त्यात विनायक नन्नवरे (30, रा.जळगाव) हा गंभीर जखमी झाला. त्यास तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जळगाव येथे हलवण्यात आले तसेच दुपारी तीन वाजेला यावलकडून ऐनपूर (ता.रावेर) येथे लग्न समारंभात जिल्हा परीषदेेचे माजी सदस्य सुभाष गेंदा सोळुंके (60, रा.चिंचोली) व प्रशांत सुरेश सोनवणे (34, रा.चुंचाळे) हे दोघं दुचाकीव्दारे जात असताना सांगवी येथे पुलाजवळ अचानक पाण्याचे टँकर रस्त्यावर आल्याने त्यापासुन बचावताना दुचाकी चालक प्रशांत सोनवणे हे दुचाकीसह थेट पुलाच्या खाली दुचाकीसह कोसळले. त्यात सुभाष सोळुंके यांच्या डोक्यास हाताला व पायाला जबर दुखापत झाली तर प्रशांत सोनवणे यांच्या पायाला व छातीला जबर दुखापत झाली. त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ.संतोष सांगोळे, नेपाली भोळे, मंजुषा कोळेकर, संजय जेधे, पिंटू बागुल यांनी प्रथमोपचार केले व त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तत्काळ जळगाव जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात हलवण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख मुन्ना पाटील, सेनेचे शरद कोळी, संंतोष धोेबी, चिंचोलीचे उपचरपंच आकाश सोळुंके, पप्पु सोळुंके सह अनेकांनी रुग्णालय गाठले.