यावल- तालुक्यातील दोन महिलांना सर्पदंश झाल्याने रविवारी ग्रामिण रूग्णालयालात दाखल करण्यात आले आहे. त्यात एकीची प्रकृती गंभीर झाल्याने तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उज्ज्वला प्रवीण चौधरी (32, रा.कोळवद) या महिलेला सकाळी शेतात निंदणी करतांना डाव्या हाताला सापाने चावा घेतला तर निर्मला श्रावण भील (45, रा.भालशिव) हिला रविवारी पहाटे अंथरूनात मानेला सापाने दंश केला. यावल येथे डॉ.रश्मी पाटील, आरती कोल्हे यांनी प्रथमोचार केले व भील हिची प्रकृती अधिक खालवल्याने तिला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलवण्यात आले आहे.