यावल तालुक्यात पोलिसांचे वॉश आऊट : सहा जणांविरोधात गुन्हा

यावल : फैजपूर पोलिस उपअधीक्षकांसह यावलमधील पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून 65 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावल शहरातील सुतार वाडा भागातून मोठ्या प्रमाणावर विषारी केमिकल मिश्रीत पन्नीची गावठी दारू जप्त करण्यात आली.

पोलिसांच्या मोहिमेमुळे उडाली खळबळ
यावल तालुक्यातील पिंप्री शिवारात तापी नदीच्या पात्रात बेकायदेशीररित्या गावठी दारूची हातभट्टीवर फैजपूरचे डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे यांनी शनिवारी पहाटे कारवाई करीत 42 हजारांचे रसायन हस्तगत केले. सहा.फौजदार अविनाश चौधरी, हवालदार दिलीप तायडे, सुमीत बाविस्कर, रशिद तडवी, अशोक जावळे, किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी आकाश निवृत्ती कोळी, पांडुरंग प्रकाश सपकाळे, दिलीप पुना कोळी तिघे रा. पिंप्री यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दहिगावातही कारवाई
तालुक्यातील दहिगाव येथे यावल पोलिस ठाण्याचे परीविक्षाधीन पोलिस निरीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैधरीत्या गावठी दारू विक्रीवर कारवाई करण्यात आली व सुमारे 10 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आरोपी रवींद्र अंबादास पाटील (दहिगाव) हा पसार झाला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

केमिकल मिश्रीत पन्नीची गावठी दारू जप्त
यावल शहरातील सुतारवाडा भागात विषारी केमिकल मिश्रीत पन्नीची गावठी दारू पोलिसांनी सापळा रचून पकडली. संशयीत आकाश हिवरकर व विजय माळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल. पन्नीत पॅक केलेली सुमारे 13 हजार रुपये किंमतीची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई परीविक्षाधीन पोलिस निरीक्षक आशीत कांबळे, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, असलम खान, सुशील घुगे, राहुल चौधरी, राजेश वाडे यांच्या पथकाने केली.