शिवसेना महिला पदाधिकार्यांचा इशारा : पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी
फैजपूर- लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणार्या भाजपा आमदार राम कदमांचे निलंबन करावे, अशी मागणी करीत वाचाळ आमदारावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी प्रांताधिकारी प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे केली. यावलसह फैजपूर परीसरात कदमांनी पाय ठेवल्यास महिला पदाधिकारी त्यांना चपलांनी चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशाराही देण्यात आला आहे.
पोरगट मंत्र्यांची हकालपट्टीची मागणी
दहिहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी अनुद्गार काढणारे कदम ही पोरगट असून ते केवळ पुरुषांच्या मतांवर निवडून आलेले नाहीत तर ज्या मतदार संघातून ते निवडून आले आहे तिथे 13 टक्के महिला मतदार आहेत, असेही निवेदनात नमूद आहे. कदम यांनी या वक्तव्यावर माफी न मागता पोरकटपणा दाखवत केवळ दिलगिरी व्यक्त केली आहे. याचा अर्थ त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांना इतके गांभीर्यपूर्ण व स्त्री शक्तीचा अपमान करणारे वाटत नाही. राम कदम यांचा आम्ही समस्त महिलावर्गाच्या वतीने अतिशय तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व राम कदम यांनी यावल तालुका परीसरात पाय ठेवल्यास आम्ही महिला म्हणून त्यांना चपलांनी चोप दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही देण्यात आला आहे. भाजपाने त्यांच्यावर कारवाई करावी शिवाय शासनाने दखल घेण्याची मागणी करीत त्यांना राज्यात भाषणबंदीची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना तालुकस महिला आघाडी प्रमुख रजनी चौधरी, महिला आघाडी शहरप्रमुख शारदा संजय काचकुटे, योगीता मंडवाले, पल्लवी झालटे, लीना चौधरी, हजारा तडवी, सुवर्णा पाटील, मीना पाटील, माधुरी पाटील, जयश्री राणे, सोनाली तायडे, पल्लवी ढाके, हेमांगी गाळफडे, भारती गाळफडे, साधना कोल्हे, वीणा चौधरी, संगीत चौधरी ,उषा भोई, पूनम कापडे, वंदना कापडे, दुर्गा कापडे, नाबाबाई भोई, कुशनबाई भोई, उषाबाई कुंभार, यास्मिन तडवी, श्रावणी चौधरी, भूपाली चौधरी, कमल मंडवाले, सोनल मंडवाले, ज्योती काठोके, रेखा तेली, तस्लिमा तडवी, सपना भोई, निर्मला भारंबे, शहर प्रमुख व नगरसेवक अमोल निंबाळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.