प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड वसुल : जमावबंदीचे उल्लंघण केल्याने पाच जणांविरुद्ध गुन्हा
यावल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना मास्क लावणे बंधनकारक केले असतानाही नागरीक मास्क न लावताच बाहेर फिरत असल्याने यावल शहरासह परीसरातील 25 नागरीकांकडून प्रत्येककी पाचशे रुपयांप्रमाणे 12 हजार 500 रुपयांचा दंड वसुल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, चार पेक्षा अधिक लोक बाहेर विनाकारण बाहेर फिरताना आढळल्याने त्यांच्याविरुद्ध सीआरपीसी कलम 144 चा भंग केल्याप्रकरणी भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.