यावल : यावल शहरासहग्रामीण भागात कोरोना या विषाणुजन्य आजाराने फैलाव सातत्याने सुरू असून दररोज पॉझीटीव्ह रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यातच नागरीक नियमांचे पालन न करता तसेच मास्क न लावताच घराबाहेर बाहेर पडत असल्याने त्यांच्याविरुद्ध यावल पोलिसांकडून धडक कारवाई केली जात आहे. रविवारी यावल पोलिस निरीक्षक अरुण धनवडे व पोलिस कर्मचार्यांनी यावल शहर व ग्रामीण भागातील नागरीकांविरुद्ध धडक मोहिम राबवली. मास्क वा रुमाल न लावता बाहेर पडणार्यांकडून प्रत्येकी पाचशे रुपयांमप्रमाणे दंड वसुल करण्यात आला तर 45 नागरीकांविरुद्ध कारवाई करून 22 हजार पाचशे रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.