यावल दारूड्याला वाचविण्यासाठी वड्री एसटी बस खड्डयात गेल्याने तिन विद्यार्थी जखमी आगार व्यवस्थापकांनी उपचारासाठी शासकीय मदत
यावल ( प्रतिनिधी ) रस्त्याच्या मध्यभागी मोटरसायकल उभी करून झोपलेल्या दारूड्याला वाचविण्या साठी यावल वड्री मार्गावर एसटी बस रोडाच्या खाली उतरल्याने झालेल्या अपघातात तिन विद्यार्थी जख्मी झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात एसटी आगाराच्या सुत्राकडुन मिळालेली माहिती अशी आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी यावल एसटी आगारातील बस क्रमांक एमएच २०डी ९९७५ही सकाळच्या सुमारास वड्री कडून प्रवाशी घेवुन यावलच्या दिशेने येत असतांना यावल शहरापासुन सुमारे एक किलो मिटर लांब असलेल्या ठिकाणी एक दारूच्या नशेतचिंब असलेला दारूडा व्यक्ती आपली दुचाकी मोटरसायकल रस्त्यावर झोपलेला होता वाहनचालक यांनी त्यास वाचविण्यासाठी एसटी बस रस्त्याच्या कडेला असलेले जिओ टॅकींगचे खड्डे असुन , त्या दारूड्या वाचविण्यासाठी यावल आगारातील चालक एस एम कोळंबे यांनी एसटी बस बाजुने काढण्याचा प्रयत्न केले असता अचानक बसचा तोल सुटल्याने एसटी बस खहुयात जाऊन उतरल्याने झालेल्या अपघात या तिन विद्यार्थीनी जख्मी झाल्या असुन ,या तिघ विद्यार्थींचे एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे . दरम्यान घटना घडल्यानंतर त्या दारूड्याने वाहनचालकाशी हुज्जत घालुन पळ काढले असल्याची माहीती एसटीतील प्रवाशांनी सांगितले , या अपघाताची माहीती मिळताच यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी तात्काळ जख्मी रूग्णाची काळजी घेत त्यांना त्वरित उपचारासाठी शासकीय मदत केली . याबाबत यावल पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद दाखल करण्यात आली आहे . यावल तालुक्यात खुलेआम हातभट्टीची गावटी दारू व पन्नी दारूची सर्वत्र विक्री होत असल्याचा हा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रीया जख्मी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यक्त केल्या असुन , एसटी चालकाने प्रसंगी दक्षता घेतली नसती तर मोठा अपघात झाला असता असे देखील अपघातास्थळी उपस्थित नागरीकांमध्ये बोलले जात आहे .