यावल । येथील पालिका सभागृहाचे नूतनीकरण आता अंतिम टप्प्यात असून 21 लाख 50 हजार रुपये खर्चातून राज्य विधानसभा सभागृहाची प्रतिकृती साकारली जात आहे. या संपूर्ण वातानूकुलित सभागृहात चढत्या क्रमाने सदस्यांची बैठक व्यवस्था असेल.
पालिका सभागृहाचे नूतनीकरण करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतुन 21 लाख 58 हजार 584 रूपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यातून विधानसभा सभागृहाप्रमाणे समोरील बाजूस नगराध्यक्षांचे आसन चढत्या क्रमाने उंची वाढत नगरसेवकांची बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहे. कुशनची खुर्ची, समोर कागदपत्र ठेवण्यासाठी टेबल, प्रत्येक टेबलावर माईक, सुशोभित मॅटींग टाकली आहे. छतावर पीओपीची डिजाईन त्यात एलइडी लाइट टाकले आहेत. नगरसेवक नगराध्यक्षांच्या बैठक व्यवस्थेच्या मध्यभागी कर्मचार्यांची बैठक व्यवस्था असेल. ही संपूर्ण कामे आता अंतिम टप्प्यात असून नगरसेवक अतुल पाटील, मनोहर सोनवणे, मुख्याधिकारी सोमनाथ आढाव, शरद कोळी, गणेश महाजन-भालेराव आदींनी कामाची पाहणी केली.