यावल ( प्रतिनिधी ) येथे मी यावलकर या शीर्षकाखाली व डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणी शासकीय आयटीआय यावल यांच्या सौजन्याने शहरातील विविध ठिकाणी यशस्वी रित्या स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . यावल नगर परिषदच्या वतीने करण्यात आलेल्या आवहानास प्रतिसाद देत शहरातील बहुसंख्य तरुण मंडळी एकत्र येऊन आज यावल स्मशानभूमी मध्ये श्रमदानात योगदान दिले त्यात प्रामुख्याने मी यावलकर या मंडळ सह यावल नगरपालिका यांच्या संयुक्त रित्या हा कार्यक्रम यावल स्मशानभूमी मध्ये घेण्यात आला.मी यावलकर या मंडळाच्या या स्वच्छता मोहीमेच्या कार्यक्रमात नागरीकांना शहरातील समाजसेवक पराग सराफ यांनी श्रमदान साठी आव्हान केले होते. या आवहानास प्रतिसाद देत स्मशान भूमी श्रमदान साठी शहरातील प्रामुख्याने नवनाथ भक्त परिवार,प्रकाश गणेश मंडळ,विठ्ठलवाडी मित्र परिवार, रेणुकादेवी परिसरातील तरुण,शिव तीर्थ मित्रपरिवार,शहरातील डॉक्टर, मेडिकल असोसिएशन सह एक दिवस महाराजांसाठी संस्थेतील सभासद, वाणी गल्लीतील तरुण,धोबी वाडा मधील तरुण मंडळी ,पंचवटी मित्र मंडळ तसेच यावल नगरपरिषदचे कर्मचारी यांनी मिळून साधारणता अडीच ते तीन तास श्रमदानाचे कार्य स्मशानभूमीच्या परिसरात केले. याप्रसंगी नगरपरिषदच्या वतीने अभियंता सत्यम पाटील,दादू धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील श्रमदानात अग्रभागी राहुन आपला सहभाग नोंदविला याशिवाय शहरातील नागरीकांनी देखील श्रमदानाच्या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी परिश्नम घेतले . या शिवाय शहरातील आठवडे बाजार परिसरात डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान व शासकीय आयटीआय आणी नगर परिषदंच्या सौजन्याने देखील मोठया प्रमाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यात प्रतिष्ठानचे सदस्य व यावल आयटीआयच्या विद्यार्थीनी व विद्यार्थी या आपला सहभाग नोंदविला .