यावल पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी सरवर तडवी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन निवृत्त

यावल ( प्रतिनिधी ) येथील पंचायत समितीत सहाय्यक प्रशासनअधिकारी म्हणुन कार्यरत असलेले सरवर सरदार तडवी हे आपल्या प्रदीर्घ उत्कृष्ठ व यशस्वी प्रशासकीय सेवेतुन दिनांक ३१ ऑगस्ट रोजी सेवा निवृत होत असुन, सरवर तडवी यांनी प्रशासकीय सेवेत कार्यतत्पर व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणुन आपती ओळख निर्माण केली . आज गुरूवारच्या दिवसी पंचायत समितीच्या सभागृहात विविध प्रशासकीय व सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातीत मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे . यावल पंचायत समिती मध्ये सहाय्यक प्रशासक अधिकारी म्हणुन सेवा करणारे सरवर सरदार तडवी हे मुळ साकळी तालुका यायल येथील राहणारे असुन, आपले शिक्षण पुर्ण केल्यावर सर्वप्रथम दिनांक १ / १२ / १९८९ जिल्हा परिषदच्या सिंचन विभाग रूजु झालेत , त्यानंतर दिनांक ८ / ६ / ९० यावल पंचायत समिती त्यांनी सेवा बजावली , दिनांक ५ / ६ / १९९३मध्ये जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागा, दिनांक १ / ४ / १९९८या कालावधीत जिल्हा परिषदच्या कृषी विभागात त्यांनी सेवा कार्य केले, यावल पंचायत समिती मध्ये दिनांक ९ / ९ / २००३ रोजी पदोन्नती होवुन कार्यालय अधिक्षक या पदावर रूजु झालेत. दिनांक २० / ६ / २००७या कालावधीत पुश्नच त्यांना पदोन्नती मिळाल्याने ते जिल्हा परिषदच्या महिला व बाल कल्याण विभाग जळगाव येथे कक्ष अधिकारी व दिनांक२२ / ७ / २०१३ जिल्हा परिषद सामाऱ्य प्रशासन विभाग व पुनश्च जळगाव येथे दिनांक १५ / २ / २०१६ पुढील तिन वर्ष महिला व बालकल्याण विभागात सेवा दिली , नंतर दिनांक१ / ८ / २०२१ते २०२३पर्यंत यावल येथे सहाय्यक प्रशासन अधिकारी या पदावर ते आज आपल्या ३३ वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतुन सेवानिवृत्त होत आहे.