यावल पालिका निवडणुकीत विकासाची दूरदृष्टी व उच्चशिक्षीत असलेल्या उमेदवारांना निवडून द्या

यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील : वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

यावल : आगामी पालिका निवडणुकीत शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी पैसा, जात-पात, धर्म, पक्ष असे राजकारण न करता उच्चशिक्षीत, अभ्यासू, सक्षम, दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान पालिकेचे गटनेता अतुल पाटील यांनी येथे केले. रविवार, 12 आयोजित वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
भुसावळ रस्त्यावरील एम.के.पाटील फार्म येथे बेस्ट फ्रेंड वेल्फेअरतर्फे अतुल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जगन्नाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी होते. प्रसंगी अतुल पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी प्रमोद नेमाडे, एम.बी.तडवी, पी.ई.पाटील, जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक सचिन पाटील, अभय देवरे, मनिष चौधरी, किरण तडवी, अताउल्ला खान, हकीम शेख, अजय पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

नागरीकांना मुबलक पाण्यासाठी नियोजन
शहरात आगामी पंचवार्षिक मध्ये 2050 च्या जनगणनेनुसार प्रत्येक नागरीकास मुबलक पाणी मिळावे म्हणून शेळगाव बॅरेजवरून पाणी घेण्यात येणार असल्याचे नियोजन असल्याचे नगरसेवक अतुल पाटील म्हणाले. प्रा. किरण दुसाने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पी.ई.पाटील, डॉ.वानखेडे, चंद्रकांत चौधरी, नगरसेवक सचिन पाटील यांची भाषणे झाली. प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, अ‍ॅड.देवकांत पाटील, नगरसेवक आभिमन्यू चौधरी, समीर मोमीन शेख, शेख असलम नबी, डॉ.सोहेल खान,
एजाज देशमुख, मो.फारुख हाजी, राजू फालक, भरत कोळी, विजय मंदवाडे, जावेद पटेल, युनूस पटेल, उमेश बोरसे, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, गोलू माळी, पप्पू पटेल, आशिष पाटील, गणेश जोशी, गणेश महाजन, एम.के.पाटील आदी उपस्थित होते. पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने सकाळपासूनच त्यांच्या निवास्थानी शहरासह तालुक्यातील अनेकांनी प्रत्यक्ष भेटून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला तसेच सोशल मिडीयाद्वारेदेखील दिवसभर शुभेच्छांचा वर्षाव झाला.