एलईडी निविदेला नगरसेवक अतुल पाटलांची हरकत
यावल : नगरपालिकेची विशेष सभा नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांच्या अध्यतेखाली सोमवारी पालिका सभागृहात झाली. 27 विषयांना सभागृहाने मंजुरी दिली. दलित वस्ती सुधारणा योजनेंतर्गत एल.ई.डी. लाईटस् बसविण्या संदर्भातील कमी दराच्या प्राप्त निविदा धारकाची निविदा मंजूर करण्यावरून नगरसेवक अतुल पाटील यांनी त्या निविदेतील त्रृटी सभागृहात मांडल्या तेव्हा त्यावरून सुमारे दोन तास चर्चा झाली.
‘भाऊ एवढा विषय मंजुर करून घ्या’ असे सांगत काही नगरसेवकांनी अतुल पाटलांना साकडे घातले मात्र पाटील यांनी आपला विरोध कायम ठेवत इतर नगरसेेवकांच्या माध्यमातुन निविदा मंजूर केल्यास हरकत नाही, असे सांगितल्यानंतर मतदानाचा निर्णय घेण्यात आला. दोन विरूध्द मताने सभागृहाने निविदा मंजूर केली.