यावल पालिकेत 12 जागांवर महिलांना मिळणार संधी

यावल : शहरात नव्याने निर्माण झालेल्या 11 प्रभागातील 23 जागांसाठी आरक्षण सोडत सोमवारी सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात नागरीकांच्या उपस्थितीत काढण्यात आली. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी प्रसात मते होते. सहकार अधिकारी म्हणून मुख्यधिकारी मनोज म्हसे होते. नगरपालिकेच्या 11 प्रभागातील 23 जागांपैकी 12 जागांवर महिलांना संधी मिळणार असून यात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती व जमातीच्या महिलेकरीता तर 11 जागा सर्वसाधारण प्रवर्गातून निवडून येणार आहेत. यात प्रत्येकी एक जागा अनुसूचित जाती-जमाती करीता आहे.

असे आहे यावल पालिकेचे आरक्षण
प्रभाग एक- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण 1, प्रभाग क्रमांक दोन- सर्वसाधारण महिला व अनुसुचित जाती, प्रभाग तीन- अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पाच- अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक सहा- सर्वसाधारण महिला व सर्वसाधार, प्रभाग क्रमांक सात- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक आठ- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक नऊ- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 10- सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11- अनुसूचित जमाती व सर्वसाधारण महिला दोन. दरम्यान, आरक्षणावर 15 ते 21 दरम्यान हरकती घेता येणार आहे.