यावल पोलिसांचा ’बेस्ट डिटेक्शन टिम’ ने सन्मान

0
यावल :  यावल शहरात गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या 10 लाखांच्या चोरीचा काही दिवसांतच छडा लावण्यात यशस्वी ठरलेल्या यावल पोलिसांचा जळगांव जिल्हा पोलीसस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांच्याकडून ’बेस्ट डिटेक्शन टीम’ म्हणून सन्मान करण्यात आला.  घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा करत यावलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व त्यांच्या टीमने चोरीतील आरोपींना चोरलेल्या ऐवजासह अटक केली होती.
या कामाची दखल घेत जिल्हा पोलीस अधिक्षकांनी यावल पोलिसांचा ’बेस्ट डिटेक्शन टीम’म्हणून गौरव केला. जळगाव येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी व पथकातील उपनिरीक्षक क अशोक अहिरे, संजीव चौधरी, युनूस तडवी, संजय तायडे, संजय देवरे, सतीश भोई, सुशील घुगे, जाकीर अली, विकास सोनवणे, राजेश महाजन आदी उपस्थित होते. जळगांव जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, फैजपूर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र रायसिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुर्‍हाडे आदींचीही प्रसंगी उपस्थिती होती.