यावल : यावलचे पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर पोलिस पथकाने दोन तलवारी व कुकरीसह आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. किशोर गुलाबराव भोईटे (55, रा.भोईटे वाडा, यावल)म असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री सरस्वती विद्या मंदिर, भोईटे वाडा चौक परीसरात ही कारवाई करण्यात आली.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
संशयीत आरोपी किशोर भोईट याच्या ताब्यातून दोन तलावर व दोन कुकरी पोलिसांनी दहशत निर्माण करताना जप्त केल्या. पोलिस कर्मचारी निलेश कैलास वाघ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात आर्म अॅक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार असलम खान दिलावर खान करीत आहे.