यावल पोलिसांनी 30 टन तांदूळ पकडला

काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याचा पोलिसांना संशय

यावल : यावल पोलिसांनी तब्बल 30 टन तांदूळ वाहतूक करणार ट्रक पकडला आहे. या ट्रकमधील तांदळाची काळ्या बाजारात विक्री केली जाणार असल्याचा संशय असून तांदळाचे नमुने जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. हा तांदूळ चोपड्याकडून गोंदिया येथे जात होता. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे

कारवाईने उडाली खळबळ
अंकलेश्वर-बर्‍हाणपुर राज्यमार्गावर शहराच्या बाहेर चोपडा रस्त्यावर ट्रक (क्रमांक एम. एच. 19 ए.सी. 0817) यातून तांदूळ वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली होती. शनिवारी रात्री चोपडा रस्त्यावरील महाजन पेट्राल पंपाजवळ सहा.फौजदार मुजफ्फर खान, सुशील घुगे, रोहिल गणेश, राजेश वाढे या पथकाने ट्रक पकडला. चालक केदार मुरलीधर गुजर व शिवराम सोमा कोळी (रा.शिरपूर) यांना ताब्यात घेतले. पंचनामा करून तांदळाचा नमुना तपासणीकामी जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. अद्यापपावेतो जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या बाबत स्पष्टता दिली नसल्याचे पोलिसांनी सांगीतले.