यावल पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक दिलीप भागवत रूजू

यावल : सर्वसामान्य नागरीकांच्या तक्रारींचे निरसन करण्यासह वाढती गुन्हेगारीला रोखण्यासाठी आपले प्रयत्न असतील, अशी भावना यावलचे नूतन पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांनी व्यक्त केली. प्रभारी आयपीएस अधिकारी आशीत कांबळे यांचा प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर त्यांच्या रीक्त जागी भागवत यांची नियुक्ती करण्यात आली. प्रसंगी निरीक्षक दिलीप भागवत म्हणाले की, पोलिस ठाण्यात आलेल्या तक्रारदारांच्या तक्रारींचे निरसन करण्यासह त्यांना परीपूर्णपणे न्याय देण्याची भूमिका पोलिस प्रशासनाची असेल शिवाय कायदा-सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यावरही आपला भर असणार आहे.

कर्मचार्‍यांनी केले स्वागत
दरम्यान, पदभार स्विकारल्यावर यावल पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलिस उपनिरीक्षक सुदाम काकडे यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत केले.