पाच जणांना अटक ; पोलिसांकडून विविध कलमान्वये गुन्हा दाखल
यावल- यावल पोलिस ठाण्याच्या आवारात शेतीच्या वादातून विरावली सरंपच तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तुषार उर्फ मुन्ना सांडुसिंग पाटील व मनसेचे माजी तालुकाध्यक्ष जुगल श्रीनिवास पाटील यांच्यासह पाच जणांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या घडली. या बाबीची पोलिस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्याच्या आवारात हाणामारी भोवली
तालुक्यातील विरावली सरपं जुगल श्रीनिवास पाटील व शिवाजी प्रेमचंद पाटील यांच्यात शेतीचा वाद असून त्यातच जुगल पाटील यांनी शिवाजी पाटील व कुटूंबातील अन्य तिघांविरूध्द न्यायालयात दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी पाटील व कुटूंबियाविरूध्द येथील पोलिस ठाण्यात चार दिवसांपूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातच मंगळवारी न्यायालयात दाखल तक्रारीचे कारण विरावलीचे सरपंच तुषार पाटील यांनी जुगल पाटील यांना विचारल्यावरून शाब्दीक वाद विकोपाला गेला. प्रसगी जुगल पाटील, तुषार पाटील, सागर सुनील चौधरी, सचिन कौतीक चौधरी, रवींद्र डिगंबर पाटील यांनी आरडाओरड करत एकमेकांशी मारामारी केली पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजीत ठाकरे, फौजदार सुनीता कोळपकर, हवालदार युनूस तडवी, नेताजी वंजारी, संजय तायडे, असलमखान, अब्दुल गनी मिर्झा, ज्ञानेश्श्वर कोळी यांनी लागलीच धाव घेत संबंधीतांचा वाद मिटवत त्यांना अटक केली. हवालदार युनूस तडवी यांच्या फिर्यादिवरून पाच जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.