यावल पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

0

पोलिस ठाण्यातच वाद ; चार जणांना पोलिसांनी केली अटक

यावल- जुन्या एका गुन्ह्यात मला तुम्ही अटक कसे करतात तसेच तुम्ही माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला, असं सांगत एकाच कुटुंबातील सर्वांनी यावल पोलिस ठाण्यात येऊन थेट पोलिस निरीक्षकांसह अन्य पोलिसांशी व पोलिस ठाण्यामध्ये बसलेल्या काही जणांशी वाद घातल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी 9 जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

चार जणांना पोलिसांनी केली अटक
एका जुन्या गुन्ह्यातील संशयीत आरोपी म्हणून अशोक रामदास बोरकर यांना अटक करण्याची प्रक्रिया पोलिस मंगळवारी करीत होते. दरम्यान, सायंकाळी याची कुणकुण लागल्याने बोरकरसोबत मनोज अशोक बोरेकर, सिद्धार्थ उर्फ मुकेश बोरेकर, नितीन उर्फ तुषार अशोक बोरेकर, लखन अशोक बोरेकर, संतोष नारायण बोरेकर, लताबाई अशोक बोरेकर, अलकाबाई नारायण बोरेकर, नारायण रामदास बोरेकर यांना घेवून पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकांच्या दालनात दाखल झाले व त्या ठिकाणी त्यांनी पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांना म्हटले की, तुम्ही माझ्यावर आधीच खोटे गुन्हे दाखल केले व आता तुम्ही मला अटक करण्याचे ठरवले आहे तेव्हा तुम्ही मला कसे अटक करतात असं सांगत पोलीस निरीक्षकांशी बोरेकर कुटुंबीयांनी हुज्जत घातली. दरम्यान, त्यावेळी पोलिस निरीक्षक केबिनमध्ये साकळी येथील तीन जण बसले होते. त्यातील एक जण मोबाईलवर बोलत असतांना पाहून बोरेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी हा आपल्या भांडणाचा व्हिडिओ चित्रण करतो आहे, असे सांगत थेट त्याच्या अंगावर धावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांनी त्यांना अडवले असता ते पोलिसांच्या अंगावर धावून गेले व पोलिसांना शिविगाळ करण्यात आली व त्यांना केबिनच्या बाहेर काढत असताना बोरेकर कुटुंबातील काहींनी स्वतःचे डोके खांबावर आपटण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळकर यांच्या फिर्यादीवरून शासकीय कामात अडथळा करणे, पोलिसांना शिविगाळ करणे, दंगलीसह आत्महत्येचा प्रयत्न आदी विविध कलमान्वये वरील नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक डी.के. परदेशी करीत आहे.

यांना पोलिसांनी केली अटक
सिद्धार्थ उर्फ मुकेश बोरेकर, नितीन उर्फ तुषार अशोक बोरेकर, संतोष नारायण बोरेकर, नारायण रामदास बोरेकर यांना पोलिलांनी अटक केली आहे.