यावल पोलिस निरीक्षकांना धक्काबुक्की ; दोघा आरोपींना कोठडी

0

यावल- जुन्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक न करण्याच्या कारणावरून पोलिस निरीक्षकांच्या दालनात हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणणार्‍या नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी अटकेतील दोघांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली तर अन्य एक अल्पवयीन असल्याने त्यास समज देवून सोडण्यात आले. अशोक बोरेकर यांना जुन्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली असून त्यांचाही जामीन त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावून त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली. अशोक रामदास बोरेकर यांच्यासह कुटूंबातील अन्य सहा जणांनी पोलीस ठाण्यात येत निरीक्षक दत्तात्रय परदेशी यांच्याशी हुज्जत घालत त्यांना शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली होती. या प्रकरणी आठ संशयीताविरूध्द पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ्रबुधवारी न्यायालयात अटकेतील एका अल्पवयीन बालकासह लखन अशोक बोरेकर, नारायण रामदास बोरेकर यांना हजर केल्यानंतर अल्पवयीन बालकास समज देवून सोडण्यात आले तर उर्वरीत दोघांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या गुन्ह्यातील मनोज अशोक बोरेकर , सिद्धार्थ उर्फ मुकेश बोरेकर,लताबाई नारायण बोरेकर, अलकाबाई अशोक बोरेकर यांचा पोलिस शोध घेत आहे.