यावल-फैजपूर रस्त्यावर दुचाकी-अ‍ॅपेत अपघात तिघे जखमी : एक अत्यवस्थ

यावल : यावल-फैजपूर रस्त्यावरील चितोडा गावाजवळ दुचाकी व अ‍ॅपे रीक्षाचा अपघात होवून तिघे जखमी झाले तर एक जण गंभीर आहे. हा अपघात हा गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडला. या अपघातात यावल येथील सहाय्यक तलाठी सुधाकर शांताराम झांबरे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दुचाकी-अ‍ॅपेत अपघात
शहरातील सहाय्यक तलाठी राजेंद्र शांताराम झांबरे (50) हे गुरुवारी आपले कामकाज आटोपून सायंकाळी सहा वाजता दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 ए.यु. 6217) द्वारे फैजपूरकडे जात होते तर फैजपूरकडून अ‍ॅपे रीक्षा (क्रमांक एम. एच. 19 एस. 2577) व्दारे चालक शेख सलीम शेख गफ्फार (35) व सैय्यद अबू बकर सैय्यद इब्राहिम (32, दोघे रा.डांगपूरा यावल) हे यावलकडे येत असताना या दोघा वाहनांचा चितोडा गावाजवळ अपघात झाला. यात तिघे जण जखमी झाले जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला, डॉ.ईरफान खान, अधिपरीचारीका नेपाली भोळे, संजय जेधे, पिंटू बागुल आदींनी प्रथमोपचार केले. यातील सहाय्यक तलाठी सुधाकर झांबरे यांच्या डोक्याला जबर दुखापत असल्याने त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या अपघातानंतर यावल ग्रामीण रुग्णालयात जखमींना मदतीसाठी महसूलचे अधिकारी, कर्मचारी धावुन आले. दरम्यान, दुचाकीस अज्ञात ट्रॅक्टरने कट मारल्याने दुचाकी अ‍ॅपेवर धडकल्याचे सांगण्यात आले.