155 शेतकर्यांनी केली नोंदणी ; खरेदीप्रसंगी शेतकर्यांचे स्वागत
यावल- कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरपावली विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या वतीने नाफेडकडून हरभरा खरेदीस गुरूवारी सुरवात करण्यात आली. सकाळी 10.30 वाजता वखार महामंडळाचे डीएमओ परीमल साळुंके यांच्या हस्ते शेतकर्यांचे स्वागत व काटा पूजन करण्यात आले. केंद्रावर 155 शेतकर्यांनी हरभरा नोंदणी केली आहे. शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात नाफेडमार्फत हरभरा खरेदी केंद्रात हरभरा शासकिय हमीभावात देण्याकामी नोंदणीस 8 एप्रिलपासुन सुरवात झाली होती.
कोरपावली सोसायटीवर खरेदीची जवाबदारी
कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीला या खरेदी केंद्राची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. 8 एप्रिलपासुन ते आजवर या खरेदी केंद्रावर तालुक्यातील 155 हरभरा उत्पादक शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर प्रत्यक्षात गुरूवारी बाजार समितीच्या आवारात शासकिय भावात हरभरा खरेदीला सुरवात झाली. वखार महामंडळ जळगावचे डीएमओ परीमल साळुंके यांच्या हस्ते प्रथम मोजणीकरीता उपस्थित शेतकरी तुळशिराम पितांबर कोळंबे (रा.कोरपावली) यांचा सत्कार करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
कोरपावली विकासोचे चेअरमन तथा बाजार समितीचे उपसभापती राकेश फेगडे, संचालक कृषीभूषण नारायण चौधरी, संचालक मुन्ना पाटील, सुनिल बारी, पुंजो पाटील, बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे, विजय कायस्थ, योेगेश चौधरी, विकासोचे सचिव मुकुंदा तायडे, नाफेडचे अनिल बारींसह शेतकरी वर्गाची उपस्थिती होती.