यावल महाविद्यालयाचे बारावी परिक्षेत घवघवीत यश

0

यावल । येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बारावीचा एकूण निकाल 83.64 टक्के लागला आहे. यात विज्ञान शाखेचा एकूण निकाल 93.54 टक्के लागला असून देवयानी भगवान सुर्यवंशी ही विद्यार्थीनी प्रथम आली आहे. कला शाखेचा एकूण निकाल 70 टक्के लागला असून कोमल चंद्रकांत साळुंखे ही 72.76 टक्के मिळवून प्रथम आली आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल 77.96 टक्के लागला असून स्नेहा बाळू पाटील ही 69.84 टक्के मिळवून प्रथम आली आहे. अकाऊंटींग ऍण्ड ऑडिटींगसाठी 33 पैकी 27 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एकूण निकाल 81.81 टक्के आहे. मार्केटींग ऍण्ड सेल्समनशिप साठी 18 पैकी 17 विद्यार्थी उर्त्तीण होवून एकूण निकाल 94.44 टक्के लागला आहे. बिल्डींग मेंटनन्स परिक्षेला बसलेल्या 8 पैकी 3 विद्यार्थी उत्तीर्ण होवून एकूण निकाल 37.05 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष नरेंद्र भास्कराव पाटील यांनी कौतुक केले आहे.

नेमाडे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित सत्यजीत राम नेमाडे माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचा एकूण निकाल 90 टक्के लागला आहे. यात कला शाखेचा एकूण निकाल 87.87 टक्के तर वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 91.89 टक्के लागला. वाणिज्य शाखेत प्रथम विजय युवराज महाजन 78.92 टक्के, द्वितीय दिनेश निवृत्ती महाजन 78 टक्के तर तृतीय भाग्यश्री डिके 75.85 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. कला शाखेत शितल रविंद्र तेली हि 79.23 टक्के प्रथम, राणी मोरे 76.46 टक्के द्वितीय तर भारती वसंत भोई 75.29 टक्के मिळवून तृतीय आली आहे.

पीएसएमएस स्कुल, बामणोद
पीएसएमएस स्कुल व कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 83.85 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा एकूण निकाल 96.70 टक्के तर कला शाखेचा एकूण निकाल 61.76 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून ऋतुजा सुरेश भंगाळे ही 521 गुण मिळवून प्रथम तर अपेक्षा सुनिल पाटील हीने 518 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकाविला आहे. कला शाखेतून प्राजक्ता दगडु तायडे हिने 472 गुण मिळवून प्रथम, गायत्री रामा नेमाडे हिने 463 गुण मिळवून
द्वितीय क्रमांक मिळविला.

न.ह. रांका हायस्कुल, बोदवड
येथील बारावी कला शाखेचा एकूण निकाल 83.12 टक्के, वाणिज्य शाखेचा 93.91 टक्के तर विज्ञान शाखेचा 91.90 टक्के निकाल लागला आहे. यात विज्ञान शाखेत सागर सोनार यास 81.38 टक्के प्रथम, दिलीप पाटील यास 75.84 टक्के द्वितीय आला. वाणिज्य शाखेत पुजा काटे 80.61 टक्के प्रथम, पंकज तेली 77.84 टक्के द्वितीय तर वैभव पाटील 77.07 टक्के मिळवून तृतीय आला आहे. कला शाखेत किरण पाटील 89.53 टक्के मिळवून प्रथम, गणेश पाटील 79.07 टक्के मिळवून द्वितीय तर आरती तिरोळे 76.76 टक्के मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.