यावल महाविद्यालयात जळगाव विद्यापीठाच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी अशा नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न
यावल (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव ह्या नामविस्तार दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी मार्गदर्शन करताना विद्यापीठाच्या नामविस्ताराची पार्श्वभूमी मांडली जळगाव, धुळे,नंदुरबार ह्या तीन जिल्ह्यांतील २०६ महाविद्यालय विद्यापीठाच्या संलग्नित आहेत. बहिणाबाई ह्या अशिक्षित कवयित्री त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८५१ साली आसोदा गावी झाला त्यांचे लग्न जळगावाचे खंडोजी चौधरी यांच्याशी झाले होते त्यांनी कवितेतून मराठी व अहिराणी भाषा वापरली आहे. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठात अभ्यासक्रमला आहेत.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा.ए. पी. पाटील यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यापीठाचा नामविस्तार हा ११ जुलै २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरच्या हिवाळी अधिवेशनात मंजूर केला. बहिणाबाई चौधरी यांनी कवितेतून संसारीं जीवन, निसर्ग जाणीव, अध्यात्मिक रहस्य,भक्ती, करूणा , प्रेम ह्या रसांची प्रेरणादायी मांडणी उलगडली आहे.
” मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला फिरी येतं पीकावर”.
मन चपय चपय त्यांचं न्यारी रे अंतर
अरे विंचु साप बरा त्याले उतारे मंतर”
ह्या काव्य रचना अहिराणी भाषेतील उत्तम आहेत.
अरे खोप्या मधी खोपा सुगरणीचा चांगला
देखा पिलांसाठी झोका तीने झाडाला टांगला.अशा कवितेतून बहिणाबाईचे मराठी साहित्य विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.आर. डी. पवार यांनी केले तर आभार प्रा. सौ. पी. व्ही. रावते यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला डॉ. एस. पी. कापडे, डॉ.हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा.मनोज पाटील, प्रा. एकनाथ सावकार, प्रा. मयूर सोनवणे, प्रा.अरूण सोनवणे, प्रा. चिंतामण पाटील उपस्थित होते. तर प्रा. सुभाष कामडी, प्रा. डॉ संतोष जाधव, प्रा. छात्रसिंग वसावे प्रा. मिलींद मोरे, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा. नंदकिशोर बोदडे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. डॉ. निर्मला पवार, मिलिंद बोरघडे, संतोष ठाकूर यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.