यावल येथील डॉक्टरांनी पाळला बंद

0

यावल। डॉक्टरांच्या मागण्यांसंदर्भात आयएमए संघटनेने तहसिलदारांना निवेदन दिल़े वैद्यकीय उपचारातील निष्काळजीपणा व लेखनिक चुकांसाठी फौजदारी कार्यवाही करू नये, ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत कमाल भरपाईची रक्कम मर्यादा ठरवावी, डॉक्टरांच्या हॉस्पीटल बाबतीत सर्व प्रकारच्या नोंदणीसाठी एकाच ठिकाणी सिंगल विंडो व्यवस्था असावी, सरकारच्या प्रत्येक आरोग्य विषयक समितीमध्ये आयएमचा प्रतिनिधी असावा, वेगवेगळ्या उपचार पद्धत्तीने अशास्त्रीय मिश्रण करू नये, आरोग्य सेवेसाठीचा निधी अडीच ते पाच टक्के वाढविण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश आह़े.

याप्रसंगी अध्यक्ष डॉ. अतुल सरोदे, सचिव डॉ. कुंदन फेगडे, डॉ. सुनिल चौधरी, डॉ. नितीन महाजन, डॉ. राजेश चौधरी, डॉ. प्रियदर्शनी सरोदे, डॉ. दिगंबर पाटील, डॉ. प्रशांत जावळे, डॉ. संगीता महाजन, डॉ. हर्षा पाटील उपस्थित होते.