यावल : शहरातील बाजीराव काशिदास कवडीवाले ज्वेलर्स दुकानात 7 जुलै रोजी भर दिवसा दरोडा पडला होता. सराफा व्यावसायीकाला पिस्टलाच्या धाकावर ओलीस ठेवत दरोडेखोरांनी 16 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 55 हजाराची रोकड मिळून 11 ल ाख 26 हजार 675 रूपयांचा मुद्देमाल लांबवल होता. या प्रकरणी सहा जणांविरोधात दरोड्याचा गुन्हा दाखलकरण्यात आल्यानंतर पाच संशयीतांना अटक करण्यात आली. संशयीतांची सोमवारी पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पाच संशयीतांची कोठडी रवानगी
सराफा दुकानावरील दरोड्याप्रकरणी निवृत्ती उर्फ शिवा हरी गायकवाड, चंद्रकांत उर्फ विक्की चाले-लोणारी, यश विजय अडकमोल, मुकेश प्रकाश भालेराव व रुपेश उर्फ भनभन चौधरी अशा पाच संशयीतांना अटक करण्यात आली. सर्व संशयीतांच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्यांना येथील न्यायलयात प्रथमवर्ग न्या.एम.एस. बनचरे यांच्यासमोर हजर केले असता पाच ही संशयीतांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पसार असलेल्या सुनील अमरसिंग बारेला (रा.गोर्यापाडा, ता.चोपडा) याचा पोलिसांकडून शो सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान, हवालदार संजय तायडे, असलम खान, सुशील घुगे, राजेश वाढे, भुषण चव्हाण, गणेश ढाकणे, रोहिल गणेश आदी करीत आहे. दरम्यान, या गुन्ह्यातील काही संशयीतांना ताब्यात मिळण्यासाठी भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी यावल न्यायालयात अर्ज दिला आहे.