यावल येथील सुन्नी इज्तेमाचेे तयारी आता अंतिम टप्प्यात

0

यावल। शहरातील सातोद रस्त्याला लागुन बुधवार 29 रोजी होणार्‍या भव्य सुन्नी इज्तेमाचेे तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बरैली शरीफचे हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती सलमान रज़ा खान राहणार आहे. या इज्तेमात सुमारे 50 हजार भाविकांची उपस्थिती लाभणार असुन देशभरातील प्रमुख वक्त्यांसह दक्षीण अफ्रीका, इंग्लंड येथील मौलवींची मार्गदर्शनार्थ उपस्थिती लाभणार आहे. शहरात बुधवार 29 रोजी सातोद रस्त्याला लागुन भव्य सुन्नी इज्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. बाजार समितीच्या मागील बाजुस असलेल्या सुमारे 7 हेक्टर क्षेत्रावर हा इज्तेमा पार पडणार असुन त्या दृष्टीने येथे तयारीस वेग आला आहे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाजबांधवांच्या वतीने साफसफाई करण्यात आली आहे.

आयोजन समितीतर्फे भाविकांची बैठकव्यवस्था
यात्रेच्या आयोजन समितीच्या वतीने कार्यक्रमा येणार्‍या भाविकांची बैठक व्यवस्था तसेच वाहन तळ व्यवस्था भोजन व जलपान व्यवस्था यांचा आराखडा तयार करून सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे या इज्तेमाचा उद्देश ‘तहफ्फुजे मस्लके आला हजरत’ यांच्या तत्वांवर समाज सुधार व धर्माची आस्थेत वाढ करीत शांतता, अहिंसा या बाबत मार्गदर्शन असे आहे तर कार्यक्रमाचे नेतृत्व हजरत अल्हाज सैय्यद अब्दुल कादीर जीलानी (मुंबई)करणार आहेत. सुत्रसंचालन हजरत कफील अंबर (कोलकत्ता) करतील या इज्तेमात राज्यभरासह शेजारील राज्यातुन देखील मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती लाभणार असुन तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

सर्वच हजरत अल्लामा मुफ्ती हफीजुल्लाह नईमी (बलरामपुर उत्तर प्रदेश), मुफ्ती महेमूद अख्तर (मुंबई), मुफ्ती शमशाद अहमद (घूसी उत्तर प्रदेश), मुफ्ती सैय्यद रिजवान शाफाई सक़ाफी (रिफाई कोकण),मौलाना अब्दुल हई नसीमुल कादरी (डरबन दक्षीण अफ्रीका), मौलाना नियाज अहमद मालीग रज्वी बर्तानीया (लंडन, इंग्लंड) आदी प्रमुख वक्ते कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.