यावल येथे आरपीआयचे रास्तारोको आंदोलन

0

यावल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) तर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी गुरुवार 27 रोजी बुरुज चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात रिपाइंतर्फे तहसिलदार व नगरपालिका मुख्याधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे.

या आहेत मागण्या
यातील मागण्यांमध्ये श्रीराम नगर, चांभार कुंड, मागासवर्गीय दलित वस्तीत मध्यभागी जुने शौचालय असून ते जिर्ण झाले आहे. ते बंद करुन त्याठिकाणी सामाजिक व सांस्कृतिक सभागृह उभारण्यात यावे, तसेच वस्ती वाढल्याने सार्वजनिक शौचालय वस्तीबाहेर हलविण्यात यावे, साकळी येथील अतिक्रमण धारकांना ती जागा नावावर करुन घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, नगरपालिकेतील शाखा अभियंता शेख बाहेरगावहून ये- जा करतात त्यांना कायमस्वरुपी राहण्याच्या सुचना देण्यात याव्यात यावल शहरातील मागासवर्गीय अतिक्रमणधारकांना घरकुलाचा लाभ मिळावा. श्रीराम नगर, तसेच मागासवर्गीय दलित वस्ती काँक्रीटीकरण करुन रस्ते बांधण्यात यावे, चांभार कुंड येथे अद्यापही कोणते विकासकामे करण्यात आले नाही, श्रीराम नगर, चांभार कुंड, मातंगवाडा, पंचशील नगर असे रहिवास वस्त्या अतिक्रमीत असून आजपर्यंत नगरपालिका कर वसुली करीत असून या वस्त्यांना नावावर करण्यात यावे, ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी यांचा समावेश आहे. याप्रसंगी राजू सुर्यवंशी, अशोक बोरेकर, मनोहर सुरळकर, सुभाष तायडे, अजय भालेराव, तुषार तायडे, मधुकर सोनवणे, प्रविण अडकमोल, मधुकर सोनवणे, मनोज बोरेकर, सागर मेढे, गौतम गजरे, रतिलाल सुरवाडे, किरण तायडे, सुकलाल पवार आदी आदी उपस्थित होते.