यावल येथे कौसर चांदपुरी मार्गदर्शन शिबीर

0

यावल । येथील मौलाना अबुल कलाम आझाद सार्वजनिक वाचनालयातर्फे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या उपक्रमांतर्गत कौसर चांदपुरी फन व शखसियत या विषयावर मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले. माजी प्राचार्य अब्दुल रऊफ शेख अध्यक्षस्थानी होते. अख्तर हुसैन शेख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. सुत्रसंचालन रईस खान यांनी केले. सेमिनार पेपरचे वाचन एम. रफिक यांनी केले. तसेच एस.एम. अन्वर, आर.एच. शेख, डॉ. असरारउल्ला बुरहानपूर, डॉ. एस.एम. शकील, मोईनुद्दीन उस्मानी, अहमद कलीम फैजपूरी यांनी कौसर चांदपुरी संबंधी विषयावर वृत्तवाचन केले.

यशस्वीतेसाठी यांनी घेतले परिश्रम
दुसर्‍या सत्रात यावल महाविद्यालयातील उर्दू विभागप्रमुख डॉ. आफाक अंजुम यांनी कौसर चांदपुरी एक हमाजहत शखसियत या विषयावर व्याख्यान केले. जहिर खान यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी अय्युब खान, इकबालोद्दीन शेख, शकिल अहमद शेख, गुलामगौस खान, मो. रफिक, जावेद खान, शेख इसाक यांनी परिश्रम घेतले.