यावल येथे गणेश उत्सवाच्या निमित्ताने महाजन स्कुलच्या वतीने विद्यार्थ्यांची सोलो नृत्य स्पर्धा संपन्न
यावल ( प्रतिनिधी ) येथील व्यास शिक्षण मंडळ व्दारे संचलित जे टी महाजन इंग्लिश स्कूल यावल येथे गणेश उत्सवानिमित्त सोलो नृत्य स्पर्धा कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला . स्कुलच्या वतीने घेण्यात आलेल्या या नृत्य स्पर्धा कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी इंग्लिश मीडियम स्कुल चे प्राचार्य डॉ. किरण खेट्टे होते जे टी महाजन इंग्लिश मीडियम स्कुल सेमीच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम सुद्धा उपस्थित होत्या या प्रसंगी नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सोलो नृत्य स्पर्ध मध्ये भाग घेतला या कार्यक्रमाचे नृत्य प्रवेशक व प्रमुख अतिथी म्हणून नृत्य प्रशिक्षक कोरिओग्राफर सुरज भालेराव व सचिन भिडे यांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर नृत्य सादर करून आपले कलागुण सादर केले .या कार्यक्रमाचे रूपेरेषा शाळेतील प्रवेशिका राजश्री लोखंडे व गौरी भिरुड यांनी आखली त्यानुसार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या शिक्षिका प्रियंका फेगडे व श्रद्धा बडगुजर यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रीती भार्गव यांनी केले तसेच शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला.