यावल येथे गुरांच्या खळ्यास आग

0

यावल । येथील नगर परिषद कार्यालय व न्यायालया समोरील डांगपुरा व प्रतापनगरला जोडणार्‍या पुलाखाली दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास उन्हामुळे आग लागली. पुलाच्या खाली दोन वासरु बांधलेलेले होते व त्या ठिकाणी चारा होता. यात वासराला वाचविण्यात आले असून चारा मात्र जळून खाक झाला. उन्हाच्या तीव्रतेने त्यास आग लागुन वासरु होरपळले गेले व चारा जळुन खाक झाला.

परिसरातील नागरिकांचीही लाभली मदत
सुदेवाने डांगपुच्यातील तरुण अन्वरबेग मिर्झा, परवेज तडवी, सलीम खान, अज्जु मन्यार, रिजवान मन्यार, मोहेब खान, शेख तन्विर यांनी आग विझविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. नगरपालिका समोरच अग्नीशमन गाडी येऊन आग बिझविण्यात अली व पुढील अनर्थ टळला.