यावल येथे दहा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

0

यावल- यावल शहरातील टी पॉईंटसह भुसावळ स्टॉप, बसस्थानक चोपडा रोड, फैजपुर रोड, वन विभागाच्या कार्यालयासमोर आदी ठिकाणी नियमबाह्य वाहन चालवणार्‍या 10 वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डि.के. परदेशी यांनी सोमवारी शहरात नियमबाह्य वाहने चालवणार्‍या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये दहा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.ही कारवाई सुनीता कोळपकर, वाहतूक शाखेचे पोलीस मुजफ्फर शेख, संजय देवरे, असलम खान, राजेश वारे, ईस्माईल तडवी यांच्यासह 15 कर्मचार्‍यांनी केली. या दंडात्मक कारवाईमुळे वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.