यावल येथे देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने भाजपाच्या वतीने नेत्रतपासणी शिबीर संपन्न
यावल ( प्रतिनिधी ) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी यावल तालुका च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीरा चे आयोजन केले होते. सदर शिबिराचे आयोजन डॉ. कुंदन फेगडे यांच्या यावल येथील भुसावळ मार्गावरील जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे करण्यात आले होते. या शिबिरामध्ये यावल -रावेर या तालुक्यातील एकूण १३०रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली तर ३५ शास्त्रक्रियेस पात्ररुग्णांना जळगाव येथे कांताई नेत्रालयात शस्त्रक्रिये करीता पाठविण्यात आले. आश्रय फाउंडेशन व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या संयुक्त विद्दमाने वतीने रुग्णांची जाण्य- येण्याची,राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली . या शिबिरात शिबीर नियोजक युवराज देसार्डा यांनी रुंगाणा मार्गदर्शन केले तर नेत्र चिकित्सक डॉ वैभव शिंदे व सहायक विनोद पाटील यांनी रुग्णांची नेत्र तपासणी केली. या कार्यक्रमांची प्रस्तावना आश्रय फाउंडेशन चे अध्यक्ष व डॉ. कुंदन फेगडे यांनी केली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांनी तर उद्घाटन स्थानी कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे सभापती हर्षल पाटील हे होते. या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती यावल सभापती हर्षल गोविंदा पाटील, माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशन अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे,भाजपा किसान मोर्चाचे जळगाव जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी,माजी जिल्हा परिषद सदस्या सविता अजय भालेराव, तालुकाध्यक्ष उमेश फेगडे सरचिटणीस विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत,किशोर कुलकर्णी, भाजपा ओबीसी सेलचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समिती यावल राकेश फेगडे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सागर कोळी,,भाजपा युवा मोर्चा तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी,मनोज बारी, रितेश बारी इ. उपस्थित होते.