जळगाव । यावल येथील श्रीराम नगरातील मयुर मधुकर या पंधरा वर्षाचा बालकाचे पाण्यात बुडुन मृत्यु झाले. आजोबाच्या शेतात केळी घेण्यासाठी जात असतांना येथील खडकाई नदी पात्रातील पाणी साचलेल्या मोठ्या खड्डयात पाय घसरुन पाण्यात बुडल्याने त्यांचा मृत्यु झाला ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. नदीपात्र कोरडे आहे मात्र पात्रात ठिकठिकाणी खड्डे असून नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्यात पाणी साचले आहे. मयुर हा नववी पास झाला होता तो यावर्षी दहावीला जाणार होता. शनिवारी कुटुंबीयांचा उपवास असल्याने शेतात केळी आणण्यासाठी तो गेला होता. यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.