यावल। शेतकर्यांचे कर्जमाफी व शेतमालाला योग्य भाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शुक्रवार 9 रोजी आंदोलन करण्यात आले. याबाबत बळीराजाची सनद म्हणून खालील प्रमाणे मागण्या आपण सरकारकडे पोहचविण्यात याव्या व सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या आहेत मागण्या
शेतकर्यांना संपूर्णपणे कर्जमाफी देवून शेतकर्यांचा सातबारा कोरा करणे, स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू करणे, शेतीसाठी सवलतीच्या दरात वीज देणे, बी-बियाणे, खते व औषधे यांचा पुरवठा शासनामार्फत बांधावर उपलब्ध करुन देणे, लहान भुधारक शेतकर्यांना किमान तीन लाख रुपयांपर्यंत कर्ज हे सरसकट शून्य टक्के व्याज दराने देणे, शेतकर्यांच्या मुलांसाठी उच्च शिक्षणाची व सर्व शिक्षणासाठीच्या प्रवासाची मोफत सोय करणे, शेतीबरोबर पुरक जोडधंद्यांसाठी विशेष योजना तयार करणे, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला उभारी देण्यासाठी विशेष योजना तयार करुन अशा कुटुंबाची सर्व जबाबदारी शासनाने घेणे या मागण्यांचा निवेदनात समावेश करण्यात आला आहे. निवेदनावर दिनकर पाटील, सुक्राम पाटील, विजय पाटील, निळकंठ फिरके, शशांक देशपांडे, प्रा. मुकेश येवले आदींच्या सह्या आहे.