यावल येथे सखी श्रावणी संस्था व पर्यावरण ग्रुपच्या वतीने स्वातंत्रदिनाचे औचित्य साधून नागरिकांना विविध वृक्षांची वाटप
यावल ( प्रतिनिधी ) येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशीय संस्थेतर्फे व पर्यावरण गृप तर्फे ७६ व्या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताचे औचित्य साधुन वृक्ष संवर्धनासाठी रोप वाटपाचा उपक्रम राबविण्यात आले . या सामाजिक संस्थेच्या वतीने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने येतात . यंदा सुद्धा १५ आॅगस्ट या स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनाच्या ७७ व्या अमृत महोत्सवा निमित्ता येथील शहरातील आठवडे बाजार परिसरातील चौक मध्ये यावल शहरातील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय सस्थाध्यक्षा सौ राजश्री नेवे यांचे नेतृत्वात विविध आयुर्वेदिक, डेरेदार सावली देणारे, आॅक्सिजन देणारे अश्या विविध रोपांचे (वृक्ष ) हाॅकर्स व ग्राहकांना वाटप करण्यात आले, याप्रसंगी जे नागरिक वृक्ष लागवडीच्या माध्यमातुन वृक्षांचे वृक्षसंवर्धन करतील त्यांनाच रोपांचे वाटप करण्यात आलेत दरम्यान पर्यावरणास पोषक असे ५००विविध आयुर्वेदीक वृक्ष वाटपाचा संकल्प संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे, यासाठी नाना पाटिल सर व सुर्यकांत पाटील ,समाजसेवक जाकिर पटेल यांचेसह हाॅकर्स झोन संघटना यांचे अनमोल सहकार्य लाभले, यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. राजश्री नेवे, कामिनी नेवे,संगिता भामरे,माया चौधरी, वंदना झांबरे, स्मिता माहूरकर,राजश्री सुरवाडे यांच्यासह सदस्या व नागरिक उपस्थीत होते यशस्वीतेसाठी उमेश नेवे ,सैय्यद.मुश्ताक,रफीक देशमुख, जावेद खान, हारुन शेख यांचे ही विशेष सहकार्य लाभले,