यावल येथे सोनसाखळी चोरट्यास केली अटक

0

यावल । येथील भुसावळ रस्त्याने 30 वर्षीय विवाहिता घराकडे जात असतांना तिला रस्त्यात अडवून मारहाण करून विनयभंग करीत विवाहितेच्या गळ्यातील 54 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन लंपास केल्याप्रकरणी येथील विरार नगरातील संशयित आरोपी मनोहर भिला पाटील याच्या विरूध्द पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 17 रोजी घडली आहे. तेव्हापासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

भुसावळ रस्त्यावर घडली होती घटना
येथील 30 वर्षीय विवाहिता 17 मार्च रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास भुसावळ रस्त्याने घराकडे जात असतांना सद्गुरु ऑटो दुकानालगत विवाहितेस येथील विरार नगरातील संशयित आरोपी मनोहर भिला पाटील याने तिचा रस्ता अडवून विवाहितेला मारहाण करत तिचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील 54 हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. याबाबत विवाहितेने येथील पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादिवरुन संशयित आरोपी मनोहर पाटील याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बोरावल गेट परिसरात केली कारवाई
घटनेच्या दिवसापासून संशयित आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता गुप्त माहितीवरून 23 रोजी तो बोरावल गेट परीसरात येत असल्याची माहीती मिळाल्यावरुन पोलिसांनी सापळा रचून त्यास सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास त्यास अटक केले आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक अहीरे, फौजदार सुनिता कोळपकर, पोलीस कॉन्स्टेबल संजय तायडे पुढील तपास करीत आहेत.