यावल रावेर तालुक्यातील पोलीस पाटलांसाठी आरक्षण जाहीर

0

महिलांसाठी 30 टकके जागा राखीव ; लवकरच होणार भरती

फैजपूर:- फैजपूर उपविभागातील यावलसह रावेर तालुक्यातील पोलीस पाटील भरतीसाठी सोमवारी दुपारी एक वाजता फैजपूर येथील नगरपालिका सभागृहात सोडत काढण्यात आली. आरक्षण सोडत प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आली. यावलचे तहसीलदार विजयकुमार ढगे व रावेरचे तहसीलदार कुंदन हिरे उपस्थित होते. 35 गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व नागरीकांची उपस्थिती होती.

यावल व रावेर तालुक्यातील एकूण 35 पोलीस पाटील भरती सन 2018 बाबत आरक्षण ची पदे ठरविताना (पेसा क्षेत्र वगळून ) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती,भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती (क) व इतर मागासवर्गीय प्रवर्ग या क्रमानुसार आरक्षण निश्चित करण्यात आले तसेच रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांवर नियुक्तीकरिता महिलांसाठी 30 टक्के समांतर आरक्षण ठेवण्यात आले. यात 35 गावांपैकी 13 गावे ही पेसा क्षेत्रासाठी राखीव करण्यात आली.

यावल तालुक्यातील आरक्षण सोडत अशी
भालोद-विमुक्त जाती (अ) सर्वसाधारण, भालशिव- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, राजोरे भटक्या जमाती (ब) सर्वसाधारण, निमगाव- अनुसूचित जमाती महिला राखीव, भोरटेक- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, कठोरा प्र सावदा- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, कोरपावली- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, पिंपरूड- इतर मागास वर्ग महिला राखीव, मालोद- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, वाघझिरा- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, बोरखेडा खुर्द- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र महिला राखीव, निमंगाव- अनुसूचित जमाती महिला राखीव.

रावेर तालुक्यातील आरक्षण अशी-
बोहर्डे- अनुसूचित जाती महिला राखीव, उदळी खुर्द- अनुसूचित जमाती महिला राखीव, नांदूरखेडा- अनुसूचित जमाती महिला राखीव, सावखेडा खुर्द अनुसूचित जमाती महिला राखीव, रमजीपूरा- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, सुनोदे- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अहिरवाडी- अनुसूचित जमाती सर्वसाधारण, खानापूर- विमुक्त जाती(अ) महिला राखीव, वाघोड- भटक्या जमाती (ब) सर्वसाधारण, दोधे- भटक्या जमाती (ब) महिला राखीव, खिरवड -भटक्या जमाती (ड) सर्वसाधारण, आभोडे बु.॥- पेसा क्षेत्र सर्वसाधारण, कुसुंबा बु.॥- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, तिड्या- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, निमड्या- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, मोहगन बु- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र, महिला राखीव, मोहमांडली नवी व जुनी- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र महिला राखीव, सहस्त्रलिंग- अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, कुसुंबे खुर्द अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र सर्वसाधारण, जानोरी- अनुसूची जमाती पेसा क्षेत्र महिला राखीव, लालमाती अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र महिला राखीव, आंदलवाडी- खुला प्रवर्ग महिला राखीव, मस्कावद-खुला प्रवर्ग महिला राखीव. या गावांची पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली आणि लावकरच रिक्त असलेल्या पोलीस पाटील यांची भरती करण्यात येणार आहे.

पेसा क्षेत्रातील यावल व रावेर तालुक्यातील महिला साठी तीस टक्के आरक्षण
यावल तालुक्यातील बोरखेडा खुर्द, वाघझिरा, मालोद तर रावेर तालुक्यातील आभोडे खुर्द, कुसुंबा बु.॥, तिड्या, निमडया, मोहगण बु.॥, मोहमाडली नवी व जुनी, सहस्त्रलिंग, कुसंबे खुर्द, जानोरी, लालमाती ही गावे महिलांसाठी आरक्षित आहे.

आमदार जिल्हा परीषद सदस्यांची दांडी
पोलीस पाटील आरक्षण सोडतीसाठी या विभागातील आमदार हरिभाऊ जावळे यांना बोलावण्यात आले होते मात्र त्यांनी या आरक्षण सोडतेला दांडी मारली तसेच यावल रावेर तालुक्यातील जिल्हा परीषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी सुद्धा दांडी मारली असल्याचे दिसून आले.