यावल शहरातील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

यावल : यावल शहरातील एका भागातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरात एका भागात 14 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार, 14 फेब्रुवारी रोजी दुपारी शाळेत जाण्यासाठी निघाली. त्यानंतर ती घरी आलीच नाही. यानंतर तीच्या आई-वडीलांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु मुलगी कुठेही आढळून आली नाही. अखेर त्यांनी यावल पोलिसात धाव घेवून अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची तक्रार दिल्याने यावल पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर करीत आहेत.