यावल शहरातील तिरुपती नगरातून दुचाकी चोरी

Two wheeler theft from Tirupati Nagar in Yawal City यावल : शहरातील तिरुपती नगरात घराबाहेर लावलेली दुचाकी अज्ञात भामट्याने चोरी लांबवली. सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून न आल्याने यावल पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांची टोळी सक्रिय
यावल शहरातील श्रीराम नगरातील रहिवासी विठ्ठल गिरधर सूर्यवंशी हे सेवानिवृत्त तलाठी असून ते आसीफ खान युसुफ खान यांच्या मालकीची दुचाकी (क्रमांक एम. एच.19 ए.आर.9269) घेऊन विस्तारीत भागातील तिरुपती नगरात ईश्वरलाल रमेश कोळी यांच्या घरी आले होते. दुचाकी त्यांनी घराच्या बाहेर लावली असता चोरट्यांनी संधी साधली. सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला मात्र दुचाकी मिळून आली नाही. तेव्हा कोणीतरी अज्ञात भामट्याने दुचाकी चोरी केली असावी अशी खात्री झाल्यावर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ करीत आहे.