Thieves again targeted a closed house in Yawal City यावल : यावल शहरातील तिरुपती नगरातील बंद घराला चोरट्यांनी टार्गट केले मात्र सुदैवाने चोरट्यांच्या हाती काही लागले नाही. शहरातील विस्तारीत भागात भुसावळ रस्त्यालगत तिरुपती नगर असून या भागातील रहिवासी अनिता मोरे-सोनार या आपल्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधली.
सुदैवाने किंमती ऐवज नसल्याने दिलासा
मोरे या घरी आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले तर कपाटातील साहित्य व कपडे अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचे दिसून आले. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी तातडीने यावल पोलिसांना माहिती दिली व यावल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली मात्र घरात कुठलेही मौल्यवान साहित्य नव्हते व काहीच चोरी गेलेले नाही मात्र, कुलूपासह कपाट फोडून नुकसान करण्यात आले. दोन दिवसात ही दुसरी घरफोडी असून यापूर्वी फालक नगरात घरफोडी झाली होती तेथून स्मार्ट टीव्ही चोरीला गेला होता. विस्तारीत भागात पोलिसांची रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी नागरीकांमधून केली जात आहे.