यावल शहरातील शेतकर्‍याची आत्महत्या

यावल : 49 वर्षीय प्रौढ इसमाने राहत्या घरात गळफास घेतल्याची घटना शहरातील शिवाजी नगर भागात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. आत्महत्येचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. ज्ञानेश्वर अर्जुन कोल्हे (49, शिवाजी नगर, यावल) असे मयताचे नाव आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास आत्महत्या
ज्ञानेश्वर अर्जुन कोल्हे (49) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्यास असून शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवार, 19 एप्रिल रोजी रात्री ते कुटुंबीयांसह जेवण करून झोपले होते. दरम्यान त्यांनी मध्यरात्री पत्र्याच्या घराच्या लाकडाच्या बल्लीला साडी बांधून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवार, 20 एप्रिल रोजी पहाटे पाच मयताचा भाचा भूषण बापू सूर्यवंशी हा उठल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेजारच्या नातेवाईकांच्या मदतीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. याबाबत मयताचा भाचा भूषण सूर्यवंशी यांच्या खबरीवरून यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.पुढील तपास पोलिस नाईक बराटे करीत आहे.