यावल शहरातून 50 हजारांचे सागवानी लाकूड जप्त

0

गस्ती पथकाची कारवाई ; संशयीत आरोपीला अटक

यावल- शहरातील भवानी पेठेतील रहिवासी अनिल भास्कर सुतार यांच्या घरात सागवानी लाकूड विनापरवानगी ठेवण्यात आले असल्याची गुप्त माहिती यावल वनविभागाच्या फिरत्या गस्ती पथकाला मिळाल्यानंतर शुक्रवारी सकाळी धाड टाकून घराची झडती घेतली असता 59 नग सागवानी चौकटी जप्त करण्यात आल्या. संशयीताकडे वनविभागाच्या पास अथवा बिल मिळून न आल्याने हा मुद्देमाल जप्त करून शासकीय यावल डेपोत जमा करण्यात आला.

यांच्या पथकाने केली कारवाई
ही कार्यवाही यावल उपवनसंरक्षक प्रकाश मोरणकर, धुळे विभागीय वनाधिकारी उमेश वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली गस्ती पथकाचे वनक्षेत्रपाल एस.आर.पाटील, वनपाल सुनील पाटील, वनरक्षक संदीप पंडित, वनरक्षक रवींद्र बी.पवार, पोलिस कॉन्स्टेबल सचिन तडवी, वाहन चालक भरत बाविस्कर आदींनी केली.