यावल शहरात आज पेहरन ए शरीफची मिरवणूक

0

शतकी परंपरा : यंदा डांगपूरा उत्सव समितीतर्फे आयोजन

यावल- शहरात पेहरन-ए-शरीफ उत्सव मंगळवार, 25 रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवास सुमारे 100 वर्षाहून जास्त वर्षाची परंपरा आहे. दरवर्षी उर्दू वर्षानुसार मोहरमच्या 14 तारखेस हा उत्सव साजरा होतो. सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन अर्थात तब्बरूक (पवित्र वस्त्र) चे दर्शन घेण्याकरीता राज्यासह परराज्यातील मुस्लीम बांधव येथे येतात त्यामुळे शहरास यात्रेचे स्वरूप येते. यावर्षी उत्सवाचे आयोजन शहरातील डांगपुरा उत्सव समीतीने केले आहे.

पवित्र वस्त्राची निघणार मिरवणूक
शहरातील नजमोद्यीन अमीरोद्यीन यांनी बगदाद येथील सय्यदना गौसे आजम दस्तगीर यांचे पेहरन आणले होते. त्यास तब्बरूक (पवित्र वस्त्र) असे म्हणतात. स्वातंत्रपुर्व काळा पासुन येथे या पवित्र वस्त्राची सजविलेल्या डोलीतून शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात धार्मीक गीत (नातेपाक) गात मिरवणूक काढण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती ती आजही कायम आहे. उत्सवात हिंदू-मुस्लीम बांधव मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने उत्सवात एकात्मतेचे दर्शन घडते.

ईच्छा होतात पूर्ण : भाविकांची श्रद्धा
मिरवणुकी दरम्यान पेहरन-ए-शरीफच्या डोलीखालून निघतांना भाविक मन्नत (मागणे) मागतात. भाविकाने मागीतलेले मागणे हमखास पूर्ण होते, अशी हिंदु-मुस्लीम भाविकांची श्रध्दा आहे. या निमित्ताने संपूर्ण शहर हिरव्या पताकांनी सजविले जाते. दुकांनावर रोषनाई केलेली असते. जिल्ह्यासह मुंबई, मालेगाव, बर्‍हाणपूर, खंडवा आदी ठिकाणाावरून मुस्लीम बांधव येथे येत असल्याने शहरातील प्रत्येक मुस्लीम बांधवांच्या घरी पाहुण्यांची वर्दळ असते. यंदाच्या वर्षी शहरातील डांगपूरा भागातील मुस्लिम बांधवांकडे आयोजनाची जवाबदारी आहे, एक वर्ष खिर्नीपुरा उत्सव सममिती तर दुसरे वर्षी डांगुपरा समीती साजरा करतात तर तिसर्‍या वर्षी बाबुजीपुरा उत्सव समीती हा उत्सव साजरा करीत असते यंदा डांगपूरा कडे आयोजनाची जवाबदारी आहे.

अशी आहे समिती.
समितीत यंदा दोन अध्यक्ष आहेत त्यात उमर अली मोहंमद कच्छी व शेख करीम शेख रज्जाक मन्यार हे आहेेत तर समितीत कोषाध्यक्ष मुशीर हाजी शे. बशीर, मो. हनीफ मन्यार, शरीफोद्यीन सिराजोद्यीन, हाजी फारूख शे. युसूफ, शकील शे. अहेमद अशी समिती आहे.

बुधवारी कुस्त्यांची आमदंगल
उत्सवाच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी दुपारी तीन वाजेला कुस्त्यांची आम दंगल होणार आहे. हडकाई नदीपात्रात होणार्‍या कुस्त्यांच्या दंगलीत बर्‍हाणपूर, मालेगाव, चाळीसगाव, पाचोरा, धुळ्यासह जिल्हयातील मल्ल येथे हजेरी लावतात. याकरीता मुस्ताक शे. हूसैन, रशीद हाजी शे. बशीर, रईस खान बिस्मिल्ला खान, रशीद अ. लतीफ मन्यार, सुफीयान मन्यार, रशीद कुरेशी, अलताफ शे. समद, मुख्तार शे. हनीफ, याकूब अली सैय्यद, शकील खान, अरशद नुर मोमीन परीश्रम घेत आहेत.