यावल शहरात कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून संरक्षणासाठी मास्क व हॅण्डग्लोजचे वाटप

0

यावल : शहरासह तालुक्यातील किराणा दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना विषाणू संसर्गापासून वाचण्यासाठी हॅण्डग्लोज तसेच मास्क वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तथा जि.प.सदस्य रवींद्र पाटील, यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा छत्रपती फाऊंडेशन अध्यक्ष अ‍ॅड.देवकांत बाजीराव पाटील, ओबोसी सेल जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, युवक तालुका सरचिटणीस किशोर माळी (गोलू) दिनेश माळी आदी उपस्थित होते.