यावल- शहरातील जनार्दन महाराज मंदिराजवळील खळ्यातून 25 हजार रुपये किंमतीच्या बैलाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची घटना 25 जून रोजी घडली. याबाबत यावल पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. शहरातील दीपक गोकुळ वायकोळ (रा.देशमुख वाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा जनार्धन महाराज मंदिर जवळ खळा आहे. त्या खळ्यात त्यांची बैलजोडी व इतर गुरे-ढोरे बांधली होती. 24 जुन रोजी रात्री त्यांनी गुरा-ढोरांना चारा पाणी करून ते घरी निघून गेले तर 25 जून रोजी सकाळी खळ्यात आले असता तेथुन एक बैल बेपत्ता होता. बैलाचा सर्वत्र शोध घेतला असता तो मिळून आला नाही. बैल चोरी झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरूध्द चोरी चा गुन्हा दाखल केला. तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र पाटील करीत आहे.