यावल । शहरासह तालुक्यात मोकाट कुत्र्यांनी चावा घेत तीन जणांना जखमी केल्याची घटना मंगळवारी घडली. सकाळी डोंगरकठोरा येथे घरा बाहेर खेळत असलेल्या टीना आनंद तायडे (5) या बालिकेस कुत्र्याने चावा घेतला तर शहरातील सर्जील शकील तडवी (19) व शानुबाई विठ्ठल घाडगे (80) या वृध्देस कुत्र्यांने चावा घेतल्याने जखमी अवस्थेत तिघांना ग्रामीण रूग्णालयात हलवल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. डॉ.रश्मी पाटील, अधिपरीचारीका संगीता डहाके यांनी उपचार केले आहे.