यावल शहरात दारूच्या नशेत बापानेच मुलीला केली मारहाण

In Yaval, the drunken father beat the daughter यावल : यावल शहरातील विठ्ठलवाडी भागातील एका मुलीला तिच्याच बापाने दारूच्या नशेत, तुझ्या आईला शोधून आण व तिच्याकडून पैसे आण असे सांगितले. मुलीने ऐकले नाही म्हणुन लाकडी दांड्याने तिच्या डोक्यावर वार करून दुखापत करण्यात आली. या प्रकरणी यावल पोलिसात मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

यावल पोलिसात गुन्हा
यावल शहरातील विठ्ठलवाडी बालसंस्कार शाळेजवळील रहिवासी मनीषा नामदेव कोळी या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची मुलगी लक्ष्मी नामदेव कोळी ही घरी होती. यावेळी दारूच्या नशेत तिचे वडील नामदेव जगन्नाथ कोळी हे आले व त्यांनी लक्ष्मीला सांगितले की, तुझ्या आईला शोधून आणि तिच्याकडून पैसे आण. लक्ष्मीने सांगितले की, मी कुठे शोधू आईला अशा सांगण्याचा राग येऊन नामदेव कोळी यांनी लाकडी दांड्याने लक्ष्मीच्या डोक्यात डाव्या बाजूला जबर दुखापत केली व तिला शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेतील लक्ष्मीला रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले व मनीषा कोळी यांच्या फिर्यादीवरून नामदेव कोळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक महेंद्र ठाकरे करीत आहे.