यावल। दिवसा सुरू असलेल्या पथदिव्यांमुळे होणारी विजेची उधळपट्टी रोखण्यासंदर्भात नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी विज वितरणकडे सूचना मांडली होती. त्यानुसार विज वितरणने अंमलबजावणीला सुरूवात केली असून, पथदिवे बंद करण्यासाठी 13 जणांची नेमणूक करण्यात आली आहे.
राज्यात विजेचा तुटवडा असल्याने शहरात भारनियमन होत आहे. तर दुसरीकडे शहरातील सुमारे दिड हजार पथदिवे सकाळी साडेआठ पर्यंत सुरू राहिल्यामुळे विजेची उधळपट्टी होते. या बाबत नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांनी विज वितरण कंम्पनीकडे लेखी सूचना केली होती. त्याची दखल घेत यावलचे उपकार्यकारी अभियंता ए.बी.गढरी यांनी आदेश दिले. सार्वजनिक पथदिव्यांसाठी असलेल्या 17 कनेक्शनवरील पथदिवे पहाटे 5.30 ते वाजेदरम्यान बंद करावेे असे आदेश त्यांनी दिले. सहाय्यक अभियंता दाभाडे यांनी 13 जणांची नियुक्ती केली आहे.